
भारतीय संघाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला.
आज एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीने सर्वाधिक २२ तर शुभमन गिलने २१ धावांची खेळी केली. तर, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने ५ विकेट्स घेतले तर नॅथन लयॉनने ३ विकेट्स घेतले.