WTC Final : भारतीय संघाचा WTCच्या अंतिम सामन्यात प्रवेश; अखेरच्या क्षणी न्यूझीलंडचा विजय आणि...

WTC Final : भारतीय संघाचा WTCच्या अंतिम सामन्यात प्रवेश; अखेरच्या क्षणी न्यूझीलंडचा विजय आणि...

आजच्या न्यूझीलंड आणि श्रीलंकेतील कसोटी सामन्यावर भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC Final) भवितव्य ठरणार होते
Published on

आज एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना सुरु असताना सर्वांचे लक्ष न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या कसोटी सामन्यावर होते. कारण, या सामन्यावर भारतीय संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भवितव्य (WTC Final) ठरणार होते. अखेर, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने २ विकेट्स राखून विजय मिळवला आणि श्रीलंका अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडली. त्यामुळे आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार आहे.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता ७ ते ११ जूनला हा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. तसेच, या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दरम्यान, श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये ८ धावांची गरज होती. अखेरच्या क्षणापर्यंत झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने हा सामना जिंकला आणि भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरली.

logo
marathi.freepressjournal.in