India Squad NZ Series : न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराटला विश्रांती, 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडिया तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
India Squad NZ Series : न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराटला विश्रांती, 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

टी-२० वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडिया तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. न्यूझीलंड मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

शिखर धवन वनडे संघाचा कर्णधार असेल. यावेळी, दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बरेच साम्य असल्याचे दिसून येते. पण दोन्ही संघांचे कर्णधार वेगळे आहेत आणि T20 कर्णधार हार्दिक एकदिवसीय संघात नाही आणि शिखर T20 संघात नाही. याशिवाय, आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू कुलदीप सेनची वनडे संघात निवड करण्यात आली आहे.

असा असेल भारतीय संघ :

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकिपर), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), डब्ल्यू सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल , मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in