टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा,सामन्यांचे वेळापत्रक जारी

न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले.
 टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा,सामन्यांचे वेळापत्रक जारी
Published on

टीम इंडियाचे वेळापत्रक २०२२ मध्ये खूपच व्यस्त राहणार असून टीम इंडिया टी-२० विश्वचषकापूर्वी अनेक देशांचा दौरा करणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचाही समावेश आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

टी-२० विश्वचषक २०२२ च्या तयारीसाठी न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत तिरंगी मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगी मालिका होणार आहे. ही मालिका ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंड फेब्रुवारी २०२३ मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर श्रीलंका न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in