अल्टिमेट खो-खो लीगमध्ये तेलुगू योद्धाजचा सलग दुसरा विजय

बालेवाडी येथे सुरू असलेल्या अल्टिमेट लीगमधील या एकूण पाचव्या सामन्यात तेलुगूसाठी आदर्शने तब्बल तीन मिनिटे ४३ सेकंद संरक्षण केले
अल्टिमेट खो-खो लीगमध्ये तेलुगू योद्धाजचा सलग दुसरा विजय

आदर्श मोहितेच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर तेलुगू योद्धाज संघाने अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. तेलुगूने राजस्थान वॉरियर्स संघाला ६८-४७ अशी २१ गुणांच्या फरकाने धूळ चारली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सुरू असलेल्या अल्टिमेट लीगमधील या एकूण पाचव्या सामन्यात तेलुगूसाठी आदर्शने तब्बल तीन मिनिटे ४३ सेकंद संरक्षण केले. त्यानंतर आक्रमणात १० गडी बाद करून त्याने राजस्थानवर वर्चस्व गाजवले.

प्रसाद पाड्येने १३ गुणांसह मोहितेला उत्तम साथ दिली. राजस्थानकडून कर्णधार मजहार जामदारने सर्वाधिक १७ गुण मिळवून कडवी झुंज दिली; परंतु त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. दरम्यान, सलग दोन विजयांसह तेलुगूने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली असून बुधवारी मुंबई खिलाडीज-गुजरात जायंट्स आणि तेलुगू योद्धाज-चेन्नई क्विक गन्स आमने-सामने येतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in