टेनिसपटू सेरेना विल्यम्सची तिसऱ्या फेरीत प्रवेश

नाओमी ओसाका, मारिया सकारी, इमा रॅडुकानू या नामांकित खेळाडूंना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला
टेनिसपटू सेरेना विल्यम्सची तिसऱ्या फेरीत प्रवेश

अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने गुरुवारी दुसऱ्या मानांकित खेळाडूवर संघर्षपूर्ण विजय नोंदवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. मात्र नाओमी ओसाका, मारिया सकारी, इमा रॅडुकानू या नामांकित खेळाडूंना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी साधण्याची सेरेनाला संधी आहे. परंतु ४० वर्षीय सेरेनाने निवृत्तीचे संकेत दिले असल्याने ही तिच्या कारकीर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरणार आहे. गुरुवारी सेरेनाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत इस्टोनियाच्या अॅनेट कोंटावेटवर ७-६ (७-४), २-६, ६-२ असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. शुक्रवारी सेरेनाची ऑस्ट्रेलियाच्या अल्जा टोमलिजॅनोविकशी गाठ पडणार आहे.

महिलांच्या अन्य लढतींमध्ये, १९व्या मानांकित डॅनिएल कॉलिन्सने जपानच्या ओसाकाला ७-६ (७-५), ६-३ अशी धूळ चारली. त्याशिवाय गतविजेती ब्रिटनची रॅडुकानू हिला अॅलिज कॉनेटने ६-३, ६-३ असे सहज पराभूत केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in