१० संघमालकांची १६ एप्रिल रोजी बैठक

२०२५च्या आयपीएलपूर्वी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये लिलाव होईल. संघांच्या एकूण पैशांच्या रकमेत वाढ करण्यासह संघात नेमके किती खेळाडू कायम ठेवण्यात येतील, याविषयीसुद्धा या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
१० संघमालकांची १६ एप्रिल रोजी बैठक

मुंबई : आयपीएलमध्ये समावेश असलेल्या १० संघांची १६ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे बैठक होणार आहे. पुढील वर्षी होणारे मेगा ऑक्शन तसेच खेळाडूंना संघात कायम राखण्याबाबत (रिटेन्शन पॉलिसी) असंख्य मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात येईल. दर तीन वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन (खेळाडूंची लिलाव प्रक्रिया) होते. यापूर्वी २०२२च्या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन झाले होते. आता २०२५च्या आयपीएलपूर्वी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये लिलाव होईल. संघांच्या एकूण पैशांच्या रकमेत वाढ करण्यासह संघात नेमके किती खेळाडू कायम ठेवण्यात येतील, याविषयीसुद्धा या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. नियमाप्रमाणे मेगा ऑक्शनपूर्वी एका संघाला ४ खेळाडूच संघात कायम ठेवता येतात. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा तसेच आयपीएलचे कार्याध्यक्ष अरुण धुमाळ या बैठकीसाठी उपस्थित असतील.

षटकांच्या संथ गतीसाठी पंतला दंड

चेन्नईविरुद्धच्या लढतीत षटकांची संथ गती राखल्याबद्दल (स्लो-ओव्हर रेट) दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला १२ लाखांचा भुर्दंड भरावा लागणार आहे. दिल्लीने निर्धारित वेळेत २ षटके कमी टाकली. स्पर्धेत दिल्लीने प्रथमच असे केल्याने फक्त पंतला १२ लाखांचा दंड आकारण्यात आला. पुढील वेळेस संघातील अन्य खेळाडूंनाही हा दंड लागू होईल. तिसऱ्यांदा असे घडल्यास पंतवर एका सामन्याची बंदी येऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in