वर्ल्ड टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपची २०२३ आणि २०२५ ची फायनल लॉर्ड्सवर होणार

आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपची २०२३ आणि २०२५ची फायनल लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर आयोजित करण्याला परवानगी दिली
वर्ल्ड टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपची २०२३ आणि २०२५ ची फायनल लॉर्ड्सवर होणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपची २०२३ आणि २०२५ ची फायनल ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवरच खेळविण्यात निर्णय घेतला आहे. आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपची २०२३ आणि २०२५ची फायनल लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर आयोजित करण्याला परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती आयसीसीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ ची फायनल देखील लॉर्ड्सवरच नियोजित होती. मात्र कोरोनामुळे हा सामना साऊथहॅम्पटनच्या आगाज् बाऊलमध्ये खेळवण्यात आला. हा सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झाला होता. न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. आयसीसी बोर्डने महिला आणि पुरूष क्रिकेटच्या २०२३ ते २०२७ फ्युचर टूर प्लॅनिंगला (एफटीपी) देखील मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसात हे एफटीपीदेखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात डॅनियल व्हिटोरी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आयसीसी पुरुष क्रिकेट समितीवर नियुक्ती देखील करण्यात आल्याचा माहिती देण्यात आली. रॉजर हार्पर आणि महेला जयवर्धने यांचीदेखील या समितीवर निवड झाली आहे. आयसीसी बोर्डाने पुढची आयसीसी चेअरमन निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासदेखील अनुमती दिली आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in