४३ वर्षीय व्हीनस विम्बल्डनमध्ये खेळणार

पाच वेळच्या विजेत्या व्हीनसला स्पर्धेच्या मुख्य फेरीत वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे
४३ वर्षीय व्हीनस विम्बल्डनमध्ये खेळणार

लंडन : अमेरिकेची टेनिसपटू व्हीनस विल्यम्स वयाच्या ४३व्या वर्षी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार आहे. पाच वेळच्या विजेत्या व्हीनसला स्पर्धेच्या मुख्य फेरीत वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे.

३ जुलैपासून विम्बल्डनला सुरुवात होणार असून व्हीनस एकूण २४व्यांदा या स्पर्धेत खेळणार आहे. व्हीनस सध्या जागतिक क्रमवारीत ६९७व्या स्थानी आहे. मात्र बर्मिंगहॅम टेनिस स्पर्धेत तिने ४८व्या क्रमांकावरील कॅमिला जिऑर्जीला पराभूत केले. गेल्या चार वर्षांत व्हीनसने प्रथमच आघाडीच्या ५० खेळाडूंपैकी एकाला नमवण्याचा पराक्रम केला. त्यामुळे तिच्यासह एकूण पाच जणांना मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in