वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये ४९ व्या वर्षीही धावणार ही महिला खेळाडू

तिला ऑस्ट्रेलियन संघाकडून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
 वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये ४९ व्या वर्षीही धावणार ही महिला खेळाडू

युजीन येथे १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅली रुडिक ४९ व्या वर्षीही धावणार आहे. ऑस्ट्रेलियन धावपटू कॅली रुडिकने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदविला आहे. ही ४९ वर्षीय धावपटू स्पर्धेत महिलांच्या ३५ किमी वॉक रेसमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेली रुडीक ही जगातील सर्वात वयस्कर धावपटू ठरणार आहे. तिला ऑस्ट्रेलियन संघाकडून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली. यापूर्वी तिने २०१५ मध्ये या स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला होता. मात्र, कानाच्या समस्येमुळे तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

रुडिकचे वडील केविन यांनी सांगितले की, रुडिकने मोठ्या जिद्दीने या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती कसून सराव करीत आहे. त्यामुळे तिला निश्चित केलेले टार्गेट यशस्विपणे गाठता येईल, याची खात्री आहे.

दरम्यान, स्पेनची रेस वॉकर जीसस एंजेल गार्सिया ही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेली सर्वात वयस्कर खेळाडू आहे. आता तिचा हाच विक्रम ऑस्ट्रेलियाची रुडिक मोडणार आहे. जीससने २०१९ मध्ये दोहा स्पर्धेत वयाच्या ४९ व्या वर्षी सहभाग नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in