यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये या खेळाडूला मिळाले सुवर्णपदक

यूथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय वेटलिफ्टर ठरला
यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये या खेळाडूला मिळाले सुवर्णपदक

गुरुनैदू सनपतीने मॅक्सिकोमधील लेऑन शहरात झालेल्या यूथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकाविले. यूथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय वेटलिफ्टर ठरला.

या स्पर्धेत सौदी अरेबियाच्या अली माजीदने २२९ किलो वजन उचलत रौप्य, तर कझाकिस्तानच्या उमरोव्हने २२४ किलो वजन उतलत कांस्यपदक मिळविले. १६ वर्षांच्या गुरुनैदूने एकूण २३० किलो (१०४ किलो अधिक १२६ किलो) वजन उचलून मुलांच्या ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. सनपतीने २०२०मध्ये आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in