श्रीलंकेच्या प्रेक्षकांच्या आदरसन्मानाने ऑस्ट्रेलियन खेळाडूही भारावून गेले

ऑस्ट्रेलियन क्रिकेटने एक व्हिडीओ ट्विट केला करून प्रेक्षकांचे खास आभार मानले
श्रीलंकेच्या प्रेक्षकांच्या आदरसन्मानाने ऑस्ट्रेलियन खेळाडूही भारावून गेले

श्रीलंकेत आर्थिक आणि राजकीय संकट ओढवलेले असतानाही कठीण काळातही दौऱ्यावर येऊन एक आदर्श ठेवल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळली गेल्याने संकटकाळातही प्रेक्षकांवर आनंदाच्या सुखद क्षणांचा शिडकावा झाला. मालिकेने नागिरकांच्या चेहऱ्यावरचा आनंद परतला. श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी केलेला आदरसन्मान पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही भारावून गेले.

मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला, तेव्हा स्टेडियममधील दृश्य पाहायला मिळाले ते जबरदस्त उत्साहवर्धक होते. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाचा पराभव होऊनही सामना संपल्यानंतर हजारो चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाचे विशेष आभार मानले. ऑस्ट्रेलियाचा विजय होताच संपूर्ण स्टेडियममध्ये ‘ऑस्ट्रेलिया.... ऑस्ट्रेलिया....’ असा उद‌्घोष दुमदुमला. हजारो प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाचे आभार मानण्यासाठी पोस्टर्सही फडकविले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटने एक व्हिडीओ ट्विट केला करून प्रेक्षकांचे खास आभार मानले आहेत.

श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत सध्या तेल आणि खाद्यपदार्थांचा मोठा तुटवडा आहे. ही परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंका दौरा रद्द करण्याची शक्यता होती; पण ऑस्ट्रेलियाने तसे न करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकली, तर यजमानांनी एकदिवसीय मालिका जिंकली. आता दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in