२०-२० विश्वचषकाचा संघ जाहीर करण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुदत

११ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर पुढील चार दिवसांपर्यंत भारताला विश्वचषकाच्या १५ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.
२०-२० विश्वचषकाचा संघ जाहीर करण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुदत

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्याकरता सर्व संघांना १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच आशिया चषकाची अंतिम फेरी ११ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर पुढील चार दिवसांपर्यंत भारताला विश्वचषकाच्या १५ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया येथे १६ ऑक्टोबर पासून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला प्रारंभ होणार असून सुपर -१२ फेरी २२ ऑक्टोबर पासून रंगेल. २३ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. गतवर्षी भारताला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात साखळी फेरीतच गाशा गुंडाळायला लागला होता. त्यामुळे यंदा निवड समितीला १५ खेळाडूंची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in