विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम लढत आज होणार

जोकोविच जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून २७ वर्षीय निक ४० व्या क्रमांकावर आहे
विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम लढत आज होणार

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत रविवारी सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस यांच्यात होणार आहे.

३५ वर्षीय जोकोविच जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून २७ वर्षीय निक ४० व्या क्रमांकावर आहे. यापूर्वीच्या दोन लढतींत निकने जोकोविचला नमविले आहे. मात्र, २०१७ नंतर हे दोन्ही खेळाडू प्रथमच आमनेसामने येणार आहेत.

फेरीत पोटाची दुखापत आणखी वाढल्यामुळे स्पेनच्या राफेल नदालने माघार घेतल्यामुळे प्रेक्षकांना जोकोविच, नदाल यांच्यातील लढत पाहण्यापासून वंचित राहावे लागले.

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोविचने ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमेरून नूरीला २-६, ६-३, ६-२, ६-४ असे पराभूत केले. दोन तास आणि ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिला सेट आणि चौथ्या सेटचा अपवाद वगळता जोकोविचला लढत जिंकण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. मात्र जोकोविचच्या खेळात नेहमीची सहजता नव्हती. त्यामुळे त्याला गुणांसाठी संघर्ष करावा लागला. जोकोविचकडूनच चुका झाल्या. यामुळेच तो स्वतःवर रागावलेलाही दिसला. बऱ्याचदा जोकोविचने नाराज नजरेने स्टेडियममधील चाहत्यांकडे पाहिले. दुसऱ्या सेटपासून मात्र त्याला लय सापडली. उपांत्यपूर्व फेरीतही जोकोविचला संघर्ष करावा लागला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in