IND vs SA : पहिल्या टी-20 आधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी, हे दोन स्टार खेळाडू जखमी

यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याला या मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पांड्या...
Rishbh Pant
Rishbh PantANI
Published on

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका (T-20 series) सुरू होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत सहभागी होऊ शकणार नाहीत. यादरम्यान यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याला या मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी ही माहिती दिली. केएल राहुलला कंबरेच्या उजव्या बाजूला दुखापत झाली आहे, तर कुलदीप यादवला नेटमध्ये फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे या दोन्ही क्रिकेटपटूंना मालिकेतून बाहेर व्हावे लागू शकते.

या मालिकेतील पहिला सामना गुरुवार, ९ जूनला दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अनुभवी रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना आयपीएलमध्ये सतत खेळल्यामुळे या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत राहुलची दुखापत हा संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.

logo
marathi.freepressjournal.in