माजी आमदाराने वयाच्या ८१व्या वर्षी भारतासाठी जिंकली दोन कांस्यपदके

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (एम) माजी आमदार एम. जे. जॅकब यांनी ही कामगिरी केली.
माजी आमदाराने वयाच्या ८१व्या वर्षी भारतासाठी  जिंकली दोन कांस्यपदके

फिनलँडमधील वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये केरळमधील एका माजी आमदाराने वयाच्या ८१व्या वर्षी भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (एम) माजी आमदार एम. जे. जॅकब यांनी ही कामगिरी केली. जॅकब यांचा नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टी. एम. जॅकब यांच्याकडून पराभव झाला होता. यापूर्वी चार वेळा ते आमदार राहिले आहेत.

अनेक राष्ट्रीय आणि आशियाई मास्टर्स स्पर्धांमध्ये पदके पटकाविणाऱ्या जेकॉब यांनी २०० मीटर आणि ८० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये कांस्यपदकांची कमाई केली. टॅम्पेरे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. ३५ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकते. जेकॉब यांनी ८० वर्षांवरील वयोगटामध्ये पदकांची कमाई केली.

जेकॉब यांनी सांगितले की, “जागतिक पातळीवर वैयक्तिक स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच पदकाची कमाई केली. हे मोठे यश आहे की नाही, मला ठाऊक नाही; मात्र ही नक्कीच समाधान देणारी कामगिरी आहे.”

जेकॉब यांची जागतिक स्तरावरील ही स्पर्धा होती. त्यांनी २०१५मध्ये फ्रान्स, २०१६मध्ये ऑस्ट्रेलिया, २०१८मध्ये स्पेनमधील स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांनी २०१४ मधील आशियाई मास्टर्सच्या, सिंगापूरमध्ये २०१६मध्ये झालेली स्पर्धा आणि चीनमधील २०१७ची आणि मलेशियातील २०१२च्या स्पर्धा यात सहभाग घेतला होता.

जॅकब यांना २००६मध्ये एका कार्यक्रमासाठी महाराज कॉलेजमध्ये आमंत्रित करण्यात आलेले असताना कॉलेजच्या काळात अ‍ॅथलेटिक्समध्ये सक्रिय असणाऱ्या जॅकब यांना धावण्याचा मोह आवरला नाही. स्पर्धेला झेंडा दाखवल्यानंतर ते स्वत: काही अंतर धावले; मात्र १०० मीटर अंतरानंतर त्यांना थकवा जाणवू लागला. या प्रसंगानंतर जॅकब यांनी पुन्हा एकदा अ‍ॅथलेटिक्सकडे वळण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर तब्बल १६ वर्षांनी त्यांना वयाच्या ८१व्या वर्षी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्यामध्ये यश आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in