वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

डिसेंबर २०१९ मध्ये तो वेस्ट इंडिजसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दिनेश रामदिन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची माहिती दिली. डिसेंबर २०१९ मध्ये तो वेस्ट इंडिजसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

रामदिनने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करीत आहे. गेली १४ वर्षे एक स्वप्न पूर्ण झाले. मी टोबॅगो आणि वेस्टसाठी क्रिकेट खेळण्यात माझी वर्षे व्यतीत केली. बालपणीची स्वप्ने पूर्ण केली. जरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असलो, तरी मी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही.

रामदिनने वेस्ट इंडिजसाठी ७४ कसोटी, १३९ एकदिवसीय आणि ७१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जुलै २००५ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिरंगी मालिकेत भारताविरुद्ध पदार्पण केले. २०१२ आणि २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचाही तो भाग होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in