
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा अहमदाबाद येथेच खेळवला जाणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला असून त्यांची विनंती फेटाळली आहे. त्यामुळे या सामन्याचं आयोजन हे अहमदाबात येथील नरेंद्र मोदी स्डेडिअमवर खेळवला जाणार आहे. जय शहा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विश्वचषकातील अंतिम सामना तसंच भारत आणि पाक यांच्यातील सामना हा १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
भारतातील एकून १२ मैदानावर विश्वचषकातील सामने रंगणार आहे. यात विश्वचषकातील अंतिम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. तर कोलकाता आणि मुंबईत येथे उपांत्य सामने खेळवले जाणार आहेत. गुवाहाटी, त्रिवेन्द्रम, लखनऊ, धर्मशाळा, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.
विश्वचषकाचे ठिकाण आणि सराव सामन्यावरुन बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात काही दिवसांपासून नाट्य सुरु असल्याने विश्वचषकाला उशिर झाला आहे. तसंच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामुळे देखील या वेळपत्रकाला उशिर झाला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही. त्यामुळे पाकिस्ताने देखील भारतात क्रिकेट खेळायला नकार दिला होता. पण आता पाकिस्तानाच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि भारतीय संघात सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.
गुजारातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या विश्वचषताकील पाच सामने खेळले जाणार आहेत. यात इंग्लड आणि न्यृझिलंड यांच्यातील सलामीचा समाना सामाना याच मैदानावर खेळवला जाणार आहे. तसंच भारत आणि पाकिस्ताना यांच्यातील थरार देखील याच मैदानावर पाहायला मिळायला मिळार आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने याच मैदानावर रंगणार आहेत. महत्वाचे म्हणजे विश्वचषकातील अंतिम महामुकाबल्याचा थरार देखील याच ठिकाण रंगणार आहे.