आगामी दोन वर्षांत भारतीय संघाचा विंडीज, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया दौरा

आयसीसीकडून २०२३ ते २०२५ पर्यंतची कार्यक्रमपत्रिका जाहीर
आगामी दोन वर्षांत भारतीय संघाचा विंडीज, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया दौरा

बंगळुरू : भारतीय संघ पुढील दोन वर्षांत वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या दौऱ्यांवर जाणार आहे. तसेच इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश यांच्याविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी भारताची पुढील दोन वर्षांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला नुकताच यंदाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गमवावी लागली, मात्र आता विंडीज दौऱ्यापासून भारत २०२३ ते २०२५ या कार्यकाळातील डब्ल्यूटीसी अभियानाला प्रारंभ करेल. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात १६ जूनपासून रंगणाऱ्या ॲशेस मालिकेद्वारे यंदाच्या डब्ल्यूटीसी स्पर्धेला सुरुवात होईल.

भारतीय संघ जुलै महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाईल. त्यानंतर थेट डिसेंबरमध्ये ते आफ्रिकेत तीन कसोटी खेळतील. यानंतर जानेवारीत इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात येईल. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेश व नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल. डिसेंबरमध्ये भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. ही आगामी डब्ल्यूटीसी सीरिजमधील भारताची अखेरची मालिका असणार आहे.

भारताचे विदेशी दौरे

वि. वेस्ट इंडिज (जुलै, २०२३)
वि. दक्षिण आफ्रिका (डिसेंबर, २०२३)
वि. ऑस्ट्रेलिया (डिसेंबर २०२४)
मायदेशातील मालिका
वि. इंग्लंड (जानेवारी २०२४)
वि. बांगलादेश (सप्टेंबर २०२४)
वि. न्यूझीलंड (नोव्हेंबर २०२४)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in