लंडन स्पिरिट संघाच्या 'या' खेळाडूने झळकविले सर्वात वेगवान अर्धशतक

रॉसिंग्टनने केवळ १५ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने ६६ धावांची खेळी करताना सात षट्कारही ठोकले.
लंडन स्पिरिट संघाच्या 'या' खेळाडूने झळकविले सर्वात वेगवान अर्धशतक

इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ या १०० चेंडूंच्या स्पर्धेच्या सामन्यात नॉर्दर्न सुपरचार्जरच्या संघाला कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर ५ विकेट्स गमावून १४३ धावा करूनही पराभव पत्करावा लागला. लंडन स्पिरिट संघाच्या ॲडम रॉसिंग्टनने सर्वात वेगवान अर्धशतक (१५ चेंडूत ५० धावा) झळकविले. युवराज सिंगचा विक्रम मोडण्यापासून तो थोडक्यात कमी पडला. त्याच्या या खेळीने फाफ ड्यू प्लेसी, मॅक्सवेलसारखे खेळाडूदेखील थक्क झाले.

रॉसिंग्टनने केवळ १५ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने ६६ धावांची खेळी करताना सात षट्कारही ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २६४ होता. रॉसिंग्टनच्या उत्कृष्ट खेळीमुळेच लंडन स्पिरिट संघाने नॉर्दर्न सुपरचार्जरचा ६६ चेंडू बाकी असताना सात गडी राखून पराभव केला.

स्पर्धेतील या १३व्या सामन्यात सुपरचार्जरकडून ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ ड्यू प्लेसिससारखे दिग्गज मैदानात उतरले आणि त्यांनी गोलंदाजांचा जबरदस्त समाचार घेतला; मात्र देशांतर्गत क्रिकेटपटू ॲडम रॉसिंग्टनने सर्वांना चकित केले. कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर नॉर्दर्न सुपरचार्जर संघाने पाच गडी गमावून १४३ धावा केल्या. यादरम्यान फाफ ड्यू प्लेसिसने ३५ चेंडूत ६ चौकार आणि २ षट्कारांसह ५६ धावा केल्या. ॲडम हॉसने १४ चेंडूत ३० धावा केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in