सामना गेला वाहून;पावसाने केली दक्षिण आफ्रिकेची पंचाईत

निर्धारित २० षटकांचा हा सामना प्रत्येकी नऊ षटकांचा करण्यात आला होता
सामना गेला वाहून;पावसाने केली दक्षिण आफ्रिकेची पंचाईत

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसात वाहून गेला. सामन्याचा निकाल लागू न शकल्याने दक्षिण आफ्रिकेची पंचाईत झाली. सहज साध्य होणारे लक्ष्य गाठण्यापासून दक्षिण आफ्रिका संघ वंचित राहिला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

सुरुवातीपासूनच सामन्यात पावसाचा व्यत्यय येत राहिला. निर्धारित २० षटकांचा हा सामना प्रत्येकी नऊ षटकांचा करण्यात आला होता. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाची करताना निर्धारित नऊ षटकांत ५ बाद ७९ धावा केल्या. वेस्ली माधेवेरेने १८ चेंडूंत सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या. लुंगी एनगिडीने २० धावांच्या मोबदल्यात दोन विके‌ट‌््स‌ घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही नऊ षटके खेळायची होती; पण विजयासाठी ८० धावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात पावसाने पुन्हा व्यत्यय आणला. रिमझिम पावसातच सामना सुरू झाल्यानंतरही दुसऱ्याच षटकात सामना थांबवावा लागला. काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. त्यावेळी नऊऐवजी सामना प्रत्येकी सात षटकांचा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेला ७ षटकांत ६४ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या ३ षटकांत बिनबाद ५१ धावा झालेल्या असताना पावसाने व्यत्यय आणला. यावेळी क्विंटन डीकॉक (१८ चेंडूंत ४७) आणि कर्णधार टेंबा बावुमा (२ चेंडूंत २) हे नाबाद होते. सहज साध्य होणारे लक्ष्य गाठण्यापासून दक्षिण आफ्रिका संघ वंचित राहिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in