बॅडमिंटन टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीत हा खेळाडू झाला पराभूत

जागतिक २३ व्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या प्रणॉयला लय सापडू शकली नाही
 बॅडमिंटन टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीत हा खेळाडू झाला पराभूत
Published on

भारताच्या एच एस प्रणॉयला शनिवारी इंडोनेशिया सुपर १००० बॅडमिंटन टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीत चीनच्या झाओ जून पेंग याच्याकडून १६-२१, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले.

जागतिक २३ व्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या प्रणॉयला लय सापडू शकली नाही. विश्व ज्युनियर चॅम्पियनशिपचे दोन वेळा कांस्यपदक िमळविणाऱ्या झाओ जून पेंगकडून ४० मिनिटे चाललेल्या सामन्यात त्याला हार पत्करावी लागली.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत हहे दोघे प्रथमच समोरासमोर उभे ठाकले होते. प्रणॉय दुसऱ्यांदा इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. परंतु चिनी खेळाडूंच्या जोरदार फटक्यांपुढे त्याचे काही चालू शकले नाही.

झाओ जून पेंगकने आपले जबरदस्त स्मॅश आणि फ्लिक शॉट्स याच्या आधारे पहिल्या गेममध्ये ११-६ अशी आघाडी घेतली. त्याने १४-९ अशी आघाडी टिकवून ठेवली. प्रणॉयमध्ये आत्मविश्वास आणि नियंत्रण यांचा अभाव जाणवला. प्रणॉयने आघाडीतील फरक १४-१६ वर आणला. परंतु चीनच्या खेळाडूने १९-१५ अशी मुसंडी मारली. त्यांनतर त्याने गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने ६-४ अशी आघाडी मिळविली. परंतु त्याच्या अनेक संधी हुकल्या आणि झाओ जून पेंग त्याच्यापुढे निघून गेला. प्रणॉयने डेन्मार्कच्या जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या रास्मस गेमकेवर सरळ गेममध्ये विजय मिळवत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.

logo
marathi.freepressjournal.in