आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून या खेळाडूने घेतली निवृत्ती

ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची मनीषा त्याने व्यक्त केली होती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून या खेळाडूने घेतली निवृत्ती

इंग्लंडला २०१९ मध्ये वन-डे क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवून देणारा कर्णधार इऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ईसीबीने एका प्रसिद्धीपत्रकात त्याच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीला दुजोरा दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची मनीषा त्याने व्यक्त केली होती. शिवाय, २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातही सहभागी होण्याची त्याची इच्छा होती. मात्र, आपल्या सध्याच्या फॉर्मचा विचार करता त्याने निवृत्ती घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला नेदरलँड्सविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यातून त्याने कंबरेच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत इंग्लंडने आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक त्यांनी जिंकला. भारतातील २०१६ चा टी-२० विश्वचषक जिंकला. शिवाय, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरीत मॉर्गनच्या नेतृत्वाखाली गाठली होती.

२०१४ मध्ये मर्यादित षटकांचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. इंग्लंडचा आतापर्यंतचा क्रिकेट इतिहासातील एकदिवसीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून मॉर्गनला ओळखले जाते. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून पराभव झाल्यानंतर मॉर्गनला टीकेला सामारे जावे लागले. त्यानंतर त्याने इंग्लंडला सर्वोत्तम वन-डे क्रिकेट संघात रूपांतरित केले.

मॉर्गनने २४८ एकदिवसीय सामन्यांमध्ये सात हजार ७०१ धावा आणि ११५ टी-२० सामन्यांमध्ये दोन हजार ४५८ धावा केल्या. गेल्या सात वर्षांत इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटचा संपूर्णत: यापालट केला.

बटलरवर नेतृत्त्वाची धुरा?

मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने जोस बटलर नवीन कर्णधार होण्याची शक्यता आहे. बटलरला इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in