सीएसके मधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खेळाडू संघातून बाहेर

सीएसकेच्या या माजी कर्णधाराने इस्टाग्रामवरून आयपीएल २०२१ आणि २०२२ मधील सर्व फोटो काढून टाकले आहेत.
सीएसके मधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खेळाडू  संघातून बाहेर

आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील (सीएसके) दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खेळाडू रवींद्र जडेजा आता संघातून बाहेर पडणार असल्याचे दिसत आहे. सीएसकेच्या या माजी कर्णधाराने इस्टाग्रामवरून आयपीएल २०२१ आणि २०२२ मधील सर्व फोटो काढून टाकले आहेत. जडेजाच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जडेजा आणि सीएसके लयांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे.

आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या दोन दिवस आधी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडून जडेजाकडे नेतृत्व सोपविले होते. कर्णधार म्हणून जडेजाची कामगिरी चांगली झाली नाही. एका बाजूला संघाचा पराभव आणि दुसऱ्या बाजूला जडेजाची खराब कामगिरी यामुळे हंगामाच्या मध्येच पुन्हा धोनीने कर्णधारपद स्वीकारले.

जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ८ पैकी ६ लढती गमावल्या. त्याची स्वत:ची कामगिरी देखील निराशाजनक झाली. त्याने १० सामन्यात २० च्या सरासरीने फक्त ११६ धावा तर ७.५१च्या इकॉनमी रेटने फक्त ५ विकेट मिळविल्या. कर्णधारपद सोडल्यानंतर काही दिवसात दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. जडेजाला संघाबाहेर करण्यात आले, अशी देखील चर्चा होती.

आता आयपीएल संपल्यानंतर तीन महिन्यांची जडेजाचा प्रोफाइल आता येलो आर्मी वाला नसल्याचे निर्दशनास आले आहे. ७ जुलै रोजी धोनीच्या वाढदिवसाला त्याने शुभेच्छादेखील दिल्या नाहीत. याआधी जडेजाने धोनीला प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या. एका चाहत्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जडेजाने या वर्षी धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्याचबरोबर त्याने इस्टाग्रामवरून चेन्नईशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. याचा अर्थ सर्व काही ठीक नाही.

अन्य एका युझरने म्हटले आहे की, जडेजा २०२३ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार नाही. त्याने चेन्नई संदर्भातील सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत.

दीपक चहल आणि अंबाती रायडू यांच्याबाबत देखील असेच वृत्त समोर येत आहे. मात्र त्याला अजून दुजोरा मिळाला नाही. चेन्नईच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे.

आयपीएलमध्ये दुखापत झाल्यानंतर जडेजा भारतीय संघाकडून देखील खेळला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तो संघात परतला. या कसोटीत पंतसोबत २२२ धावांची भागिदारी केली आणि स्वत:चे शतकदेखील पूर्ण केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in