१८ ऑगस्ट रोजी रंगणार प्रो गोविंदा स्पर्धेचे दुसरे पर्व; संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा संपन्न, १६ पथकांमध्ये जुगलबंदी

प्रो गोविंदचे दुसरे पर्व यंदा रविवार, १८ ऑगस्ट रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा ताज लँड्स एंड हॉटेल, बांद्रा मुंबई येथे पार पडला.
१८ ऑगस्ट रोजी रंगणार प्रो गोविंदा स्पर्धेचे दुसरे पर्व; संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा संपन्न, १६ पथकांमध्ये जुगलबंदी
Published on

मुंबई : प्रो गोविंदचे दुसरे पर्व यंदा रविवार, १८ ऑगस्ट रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा ताज लँड्स एंड हॉटेल, बांद्रा मुंबई येथे पार पडला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ज्या प्रमाणे क्रिकेट, कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला. त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळा खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रो गोविंदासाठी १६ संघांची निवड करण्यात आली. या संघांचे नामकरण तसेच १६ संघांच्या जर्सीचे अनावरणही करण्यात आले. आयपीएल प्रमाणे प्रत्येक संघ एक एक मालकाने निवडला असून पुढील हंगामापर्यंत हे संघ या मालकांकडे राहणार आहेत. यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, “मी स्वप्न पाहिलं होते की आपला मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावे ही इच्छा युवासेना कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते.”

'या' पथकांचा सहभाग

  • कोकण नगर (कोकण जायंट्स)

  • जय जवान (सातारा सिंघम)

  • यश गोविंदा पथक (लातूर लेजेण्ड्स)

  • श्री आग्रेश्वर गोविंदा पथक (नाशिक चॅलेंजर)

  • शिव गणेश गोविंदा (संभाजी नगर रॉयल)

  • हिंदू एकता गोविंदा पथक (रायगड रॉयल)

  • ओम ब्रह्मांड साई गोविंदा (सेंट्रल मुंबई)

  • ओम साई सेवा मंडळ (नवी मुंबई स्ट्राईकर)

  • बाल उत्सव गोविंदा (मीरा-भाईंदर योद्धा)

  • विघ्नहर्ता गोविंदा पथक (पुणे पँथर)

  • अष्टविनायक गोविंदा पथक (अमरावती ग्लाडीटर्स)

  • बालवीर गोविंदा पथक (कोल्हापूर किंग)

  • शिव साई क्रीडा मंडळ (नागपूर निन्जा)

  • आर्यन्स गोविंदा पथक (ठाणे टायगर)

  • साईराम गोविंदा पथक (बारामती ब्लास्टर)

  • हिंदमाता गोविंदा पथक (वेस्टर्न मुंबई)

logo
marathi.freepressjournal.in