पाचव्या, सातव्या क्रमांकासाठी परिस्थिती स्पष्ट नाही - पुजारा

मधली फळी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत पर्याय शोधावे लागतील.
पाचव्या, सातव्या क्रमांकासाठी परिस्थिती स्पष्ट नाही - पुजारा

‘टीम इंडियामध्ये पाचव्या आणि सातव्या क्रमाकांसाठी अजूनही परिस्थिती स्पष्ट नाही. टीम इंडियाला आपली मधली फळी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत पर्याय शोधावे लागतील. रवींद्र जडेजाचा पर्याय म्हणून अक्षर पटेलला घेता येईल,’’ असे भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले.

पुजारा म्हणाला की, ‘‘मधल्या फळीतील समस्येवर तोडगा काढण्यासाठी संघ व्यवस्थापन आगामी मालिकेत प्रयोग सुरू ठेवण्याची शक्यता आहे. दीपक हुडा पाचव्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार आहे हे खरे असले तरी संजू सॅमसन हादेखील पर्याय असू शकतो; पण संघ व्यवस्थापनाचा दृष्टिकोन काय आहे हेही पाहावे लागेल’’ पुजाराने पुढे सांगितले की, कोहली फॉर्ममध्ये आहे. त्याने टी-२० मध्ये जे शतक झळकाविले. त्याचा परिणाम इतर फॉरमॅटमध्येही दिसून येईल. कोहली बऱ्याच दिवसांपासून शतकासाठी प्रयत्न करत होता. मेहनत घेत होता.

अखेर त्याचे गोड फळ त्याला मिळाले. आता वन-डे, कसोटी फॉरमॅटमध्येही कोहली नव्या आत्मविश्वासाने खेळताना दिसेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in