भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर,या खेळाडूंचा संघात समावेश

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामना गेल्या वर्षी कोविड-१९ मुळे होऊ शकला नाही
भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर,या खेळाडूंचा संघात समावेश

इंग्लंडने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सचा संघात समावेश केला आहे. आयपीएलमध्ये बिलिंग्स कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत होता. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी न खेळलेल्या जेम्स अँडरसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

अलीकडेच कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेल्या बेन फाेक्सचाही या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी फॉक्सला संघात ठेवण्यात आले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामना गेल्या वर्षी कोविड-१९ मुळे होऊ शकला नाही. भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. आता शुक्रवारपासून मालिकेतील निर्णायक सामना खेळविला जाणार आहे. बेन फॉक्स फिट नसल्यास बिलिंग्सवर पुन्हा यष्टीरक्षणाची जबाबदारी राहील. इंग्लंडचा स्टार कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसनला भारताविरुद्ध विक्रम करण्याची नामी संधी आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० विकेट घेण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दोनच गोलंदाजांनी ६५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरन (आठशे विकेट्स) आणि दिवंगत शेन वॉर्न (७०८ विकेट्स) हे दोघेही फिरकीपटू आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. रोहित शर्मा लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. तो खेळण्याबाबत अद्यापही साशंकता आहे. दरम्यान, सलामीवीर मयंक अगरवाल संघात सामील झाला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मयंक सलामीला येऊ शकतो. दुसरा सलामीवीर शुभमन गिल असेल. त्याने सराव सामन्यात शानदार कामगिरी केली होती. भारताकडे सलामीसाठी चेतेश्वर पुजाराचाही पर्याय आहे.

इंग्लंड संघ : बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, सैम बिलिंग्स, स्टुअर्ट ब्रॉड, हैरी ब्रूक, जैक क्राउले, बेन फोक्स, जैक लीच, एलेक्स ली, क्रेग ओवरटन, जेमी ओवरटन, मैथ्यू पॉट्स, ओली पोप आणि जो रूट.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in