आकिब जावेद श्रीलंकेचा गोलंदाजी प्रशिक्षक

आकिब जावेद सध्या पाकिस्तान प्रीमियर लीगमधील लाहोर कलंदर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांचा कार्यकाळ तत्काळ सुरू होणार आहे.
आकिब जावेद श्रीलंकेचा गोलंदाजी प्रशिक्षक

कोलंबो : श्रीलंका क्रिकेट मंडळाने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद याची श्रीलंकेच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. “आकिब जावेद याची श्रीलंका संघाकरिता वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत त्याचा कालावधी असेल,” असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

आकिब जावेद सध्या पाकिस्तान प्रीमियर लीगमधील लाहोर कलंदर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांचा कार्यकाळ तत्काळ सुरू होणार आहे. आकिब जावेदने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना १६३ वनडे आणि २२ कसोटी सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २३६ विकेट्स जमा आहेत. १९९२च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तान संघाचा मुख्य भाग असलेल्या आकिब जावेदने अनेक राष्ट्रीय संघांकरिता प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in