‘पीएसजी’च्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये त्रिमूर्ती चमकली

टेरॉन चेरीने २४व्या मिनिटाला मकाबी संघासाठी धक्कादायक गोल नोंदवल्यामुळे पीएसजीवर पराभवाचे ढग निर्माण झाले होते
‘पीएसजी’च्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये     त्रिमूर्ती चमकली
Published on

लिओनेल मेसी, किलियान एम्बापे आणि नेयमार या अनुभवी आक्रमणपटूंच्या त्रिकुटाने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये मकाबी हैफा संघाला ३-१ अशी धूळ चारली.

टेरॉन चेरीने २४व्या मिनिटाला मकाबी संघासाठी धक्कादायक गोल नोंदवल्यामुळे पीएसजीवर पराभवाचे ढग निर्माण झाले होते; मात्र मेसीने ३७व्या मिनिटाला गोल झळकावून पीएसजीला मध्यंतरापूर्वी १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात एम्बापे आणि नेयमार यांनी अनुक्रमे ६९ आणि ८८ मिनिटाला गोल नोंदवून पीएसजीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बार्सिलोना पराभूत; माद्रिदचा विजय

चॅम्पियन्स लीगमधील अन्य साखळी सामन्यात बायर्न म्युनिकने बार्सिलोनाला २-० असे पराभूत केले, तर रेयाल माद्रिदने आरबी लेपझिगवर २-० अशी मात केली. बायर्नकडून लुकास हर्नांडेझ आणि लेरॉय साने यांनी गोल नोंदवले. बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या रॉबर्ट लेवांडोवस्कीला आपल्या माजी संघाविरुद्ध (बायर्न) छाप पाडता आली नाही.

logo
marathi.freepressjournal.in