Football Worldcup : विश्वचषक अंतिम सामना हा मेस्सीचा शेवटचा सामना ठरणार ; नेमकं तो काय म्हणाला ?

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 गोल करण्याचा विक्रम मेस्सीच्या नावावर आहे
Football Worldcup : विश्वचषक अंतिम सामना हा मेस्सीचा शेवटचा सामना ठरणार ; नेमकं तो काय म्हणाला ?
Published on

अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, हा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचाही शेवटचा सामना असेल. या सामन्यानंतर मेस्सीने निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या विश्वचषकात मेस्सीने आतापर्यंत पाच गोल केले असून, तो अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 गोल करण्याचा विक्रम मेस्सीच्या नावावर आहे.

“मी ही कामगिरी केल्याचा आनंद आहे. मेस्सीने अर्जेंटिनाच्या डायरिओ डेपोर्टिव्हो ओले ला सांगितले की, “विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळून मला आनंद होत आहे.

“पुढील स्पर्धा बरीच वर्षे दूर आहे, मला वाटत नाही की ते शक्य होईल. हा शेवट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे," असे मेस्सी म्हणाला. क्रोएशियाविरुद्धच्या विजयानंतर मेस्सीने आपल्या खेळाडूंना या क्षणाचा आनंद लुटण्यास सांगितले. "अर्जेंटिना पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आहे, मजा करा," असे त्याने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in