भारतीय कुस्ती महासंघ आमच्या पाठीशी नाही, विनेशचे पती सोमवीर राठी यांची खंत

कुस्तीपटू विनेश फोगटचे भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर तिचा पती सोमवीर राठी यांनी पॅरिसमध्ये तिच्याबाबत काय घडले, याचे खुलासे केले आहेत.
भारतीय कुस्ती महासंघ आमच्या पाठीशी नाही, विनेशचे पती सोमवीर राठी यांची खंत
@somvir_rathee/ Instagram
Published on

नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगटचे भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर तिचा पती सोमवीर राठी यांनी पॅरिसमध्ये तिच्याबाबत काय घडले, याचे खुलासे केले आहेत. आमच्यासाठी हा सर्वात कठीण प्रसंग असला तरी भारतीय कुस्ती महासंघ आमच्यासोबत नाही. त्यामुळे ती निवृत्तीचा निर्णय मागे घेणार नाही, असे सोमवीरने सांगितले.

विनेश फोगटसोबत ऑलिम्पिकमध्ये जे घडले, ते आतापर्यंत कोणत्याही खेळाडूबरोबर घडले नाही. वजन कमी करण्यासाठी विनेशने बरेच उपाय केले आणि यादरम्यान तिला आपला जीवही गमवावा लागला असता. विनेश अंतिम फेरीत पोहोचली होती. ती अंतिम फेरीत हरली असती तरी तिला रौप्यपदक मिळाले असते. पण तिला अंतिम फेरी खेळताच आले नाही. या सर्व गोष्टी जेव्हा घडत होत्या, तेव्हा तिची वाईट अवस्था होती. तो क्षण शब्दांत सांगता येणार नाही.”

“त्या घटनेनंतर आम्ही आताच भारतात परतलो आहोत, त्यामुळे नेमकं काय करावे, हे आता सांगता येणार नाही. आमच्यासाठी हा सर्वात कठीण प्रसंग आहे. पण आम्हाला अपेक्षेप्रमाणे भारतीय कुस्ती महासंघाची साथ लाभली नाही. भारताची संघटनाच आमच्याबरोबर नसेल तर विनेशने काय करावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तिने कुणासाठी खेळावे, हे आम्हाला सतावत आहे. विनेशला या संपूर्ण प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचा पाठिंबा लाभला नाही.”

logo
marathi.freepressjournal.in