विम्बल्डन टेनिस स्पर्धेत 'या' महिला खेळाडूने पटकावले एकेरीचे विजेतेपद

ग्रँडस्लॅम जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली खेळाडू ठरली.
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत 'या' महिला खेळाडूने पटकावले एकेरीचे विजेतेपद

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेंटर कोर्टवर रंगलेल्या अंतिम सामन्यात शनिवारी कझाकस्तानच्या एलिना रिबाकिनाने ट्युनिशियाची ओन्स जाबेऊर हिला ३-६, ६-२, ६-२ असे नमवित महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. कारकीर्दीतील तिचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. ग्रँडस्लॅम जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली खेळाडू ठरली.

जाबेऊरने पहिला सेट ६-३ ने जिंकला. या सेटमध्ये रिबाकिनाला लय राखण्यात अपयश आले. त्यानंतर जोरदार मुसंडी मारत रिबाकिनाने दुसरा सेट ६-२ ने जिंकला. रिबाकिनाने मग तिसऱ्या सेटला आत्मविश्वासपूर्वक सुरुवात केली. हा सेट तिने ६-२ असा जिंकत विजेतेपद पटकाविले.

जागतिक क्रमवारीत जाबेऊर दुसऱ्या, तर रिबाकिना २३ व्या क्रमांकावर आहे. यापूर्वीच्या तीन पैकी दोन लढतींत ओन्सने एलिनाला नमविले होते.

विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आता नवविजेती मिळाली. तिसऱ्या मानांकित जाबेऊरने अपेक्षित कामगिरी करताना प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सतराव्या मानांकित रिबाकिनाने उपांत्य फेरीत माजी विजेत्या सिमोना हालेपवर अनपेक्षितपणे अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.

जाबेऊरचे पारडे जड मानले जात होते. तिने उपांत्य फेरीत जर्मनीच्या मारियावर विजय मिळविला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in