संपूर्ण जगात चार हजार वाघ असतील; पण राहुल द्रविड फक्त एकच - रॉस टेलर

या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टेलर यांनी 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
संपूर्ण जगात चार हजार वाघ असतील; पण राहुल द्रविड फक्त एकच - रॉस टेलर
Published on

राजस्थानमधील राष्ट्रीय उद्यानात मी राहुल द्रविडसमवेत वाघ पाहण्यासाठी गेलो. वाघ दिसल्याने अन्य पंर्यटकांनाही आनंद झाला; पण वाहनांतील लोकांनी लगेच आपले कॅमेरे राहुल द्रविडकडे वळवले. लोक त्याला पाहण्यासाठी ते जितके उत्सुक होते; तितकेच आम्ही वाघ पाहण्यासाठी होतो. जगात बहुधा चार हजार वाघ असतील, पण राहुल द्रविड हा एकच आहे, असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार रॉस टेलर यांनी व्यक्त केले.

या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टेलर यांनी 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. पुस्तकामध्ये त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी संबंधित एक प्रसंग लिहिला आहे. टेलर आणि राहुल दोघेही वाघ पाहण्यासाठी राजस्थानमधील राष्ट्रीय उद्यानात गेले असतानाची आठवण सांगताना टेलर यांनी लिहिले की, सामान्य लोकांना वाघ पाहण्यापेक्षा द्रविडमध्ये जास्त रस होता आणि त्याचे फॅन फॉलोइंग पाहून आश्चर्य वाटले. टेलरने यांनी पुढे लिहिले की, मी द्रविडला विचारले, तू किती वेळा वाघ पाहिला आहे? तो म्हणाला, मी कधीही वाघ पाहिला नाही. मी उद्यानात २१ वेळा आलो आहे आणि एकही वाघ पाहिला नाही. २१ सफारीमध्ये वाघ न दिसलेल्या द्रविडला अर्ध्या तासात २२ व्या सफारीत वाघ दिसला; परंतु पर्यटकांना मात्र राहुल हाच वाघ वाटला. राहुल द्रविड आणि रॉस टेलर २००८ ते २०११ या कालावधीत आयपीएलच्या चार सीझनमध्ये एकत्र खेळले होते. दोघेही २००८ ते २०१० पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होते. दोघेही राजस्थान रॉयल्सकडूनही खेळले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in