म्हणुन राष्ट्रकुल स्पर्धेच्या ट्रायल्समधुन मेरी कोमची माघार...

मेरीने माघार घेतल्याने हरयाणाची नीतू राष्ट्रकुल स्पर्धेच्या ट्रायल्समध्ये अंतिम फेरीत पोहोचली
म्हणुन राष्ट्रकुल स्पर्धेच्या ट्रायल्समधुन मेरी कोमची माघार...

भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोमने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या ४८ किलो वजनी गटाच्या ट्रायल्समधून माघार घेतली. तिने दुखापतीमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. सहा वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या मेरी कोमला ४८ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीतच दुखापत झाली होती. मेरीने माघार घेतल्याने हरयाणाची नीतू राष्ट्रकुल स्पर्धेच्या ट्रायल्समध्ये अंतिम फेरीत पोहोचली. तिला विजयी घोषित करण्यात आले.

२०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम पहिल्याच फेरीत खाली कोसळली. ३९ वर्षांच्या मेरीने झुंजार वृत्ती दाखवूनही काही वेळाने तिला डाव्या पायाच्या वेदना असह्य झाल्या. तिला रिंगबाहेर घेऊन जाण्यात आले. त्यानंतर नीतूला पंचांनी विजयी घोषित केले. त्यानंतर मेरी कोमने ट्रायल्समधूनच माघार घेतली. आता बर्मिंगहॅममध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत मेरी कोमच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in