यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी या खेळाडूंना नामांकन

यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी या खेळाडूंना नामांकन

सूर्यकुमारने आपल्या चौफेर फटकेबाजीने जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने तीन अर्धशतक झळकावले

भारताचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि महिला संघातील डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना (Smruti Mandhana) यांना यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. ‘आयसीसी’ने गुरुवारी पुरुष आणि महिला विभागातील प्रत्येकी चार नामांकन लाभलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.

मुंबईकर सूर्यकुमारने आपल्या चौफेर फटकेबाजीने जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने तीन अर्धशतक झळकावले. त्याशिवाय वर्षभरात त्याने १८७च्या स्ट्राइक रेटने १,१६४ धावा करताना ६८ षटकार लगावले. वर्षभरात त्याने टी-२०मध्ये दोन शतके व नऊ अर्धशतके झळकावली. मात्र सूर्यकुमारला या पुरस्कारासाठी पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन यांच्याकडून कडवी चुरस मिळेल.

महिलांमध्ये गतवर्षी सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्मृतीला सलग दुसऱ्यांदा नामांकन लाभले आहे. स्मृतीने या वर्षात २,५०० टी-२० धावांचा टप्पा गाठला. त्याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत नेण्यात तिचे मोलाचे योगदान होते. टी-२० आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतही स्मृतीने छाप पाडली. तिने भारताकडून २३ चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in