ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट स्पर्धेत भारताचे 'हे' खेळाडू दुसऱ्या फेरीत दाखल

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात एक तास चाललेल्या लढतीत २१-१७, १५-२१, २१-१८ असे नमविले
 ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट स्पर्धेत भारताचे 'हे' खेळाडू दुसऱ्या फेरीत दाखल

सिंगापूर ओपन सुपर ५०० बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये भारताचे मिथुन मंजूनाथ आणि अश्मिता चालिहाने बुधवारी आपल्या अनुभवी प्रतिस्पर्ध्याना मात देत उलटफेर केला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फॉर्ममध्ये असलेला एच. एस. प्रणॉयसुध्दा दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यास यशस्वी ठरला.

मंजूनाथने आपल्यच देशाचा विश्व चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता किदांबी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात एक तास चाललेल्या लढतीत २१-१७, १५-२१, २१-१८ असे नमविले. अश्मिताने महिला एकेरीत जागतिक क्रमवारीतील १२ व्या क्रमांकाची खेळाडू थायलंडची बुसानन ओंगबामरुंगफानला २१-१६, २१-११ असे नमविले. जागतिक क्रमवारीतील ७७ व्या क्रमांकाचा खेळाडू मंजूनाथ पुढील फेरीत एनहाट एनगुएनशी लढत देईल. गेल्या आठवड्यात मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या प्रणॉयने थायलंडच्या सितिकोम थमासिनला २१-१३, २१-१६ ने हरविले. पुढील फेरीत त्याचा मुकाबला तिसरा मानांकित चोऊ टिएन चेन याच्याशी होईल.

मलेशिया ओपनमध्ये प्रणॉयने त्याचा पराभव केला होता. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जागितक क्रमवारीतील ३६ व्या क्रमांकाची खेळाडू बेल्जियमची लियाने टॅन हिला २१-१५, २१-११ ने सहजगत्या नमविले. पुढील फेरीत सिंधूचा मुकाबला व्हिएतनामच्या थुइ लिन एनगुएनशी होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in