दिल्लीचा हा बॉक्सर ठरला ‘डब्ल्यूबीसी इंडिया’चा मानकरी

सुपर फीदरवेट गटात झालेला हा मुकाबला ३२ मिनिटे चालला. पंचांनी अझहरल ७९-७२, ७६-७५, ७९-७२ असे विजयी घोषित केले
दिल्लीचा हा बॉक्सर ठरला ‘डब्ल्यूबीसी इंडिया’चा मानकरी
Published on

दिल्लीचा सुपर हेवीवेट बॉक्सर मोहम्मद अझहर हा धर्मवीर सिंहवर सर्वसहमतीच्या निर्णयाच्या आधारे विजय मिळवून ‘डब्ल्यूबीसी इंडिया’चा मानकरी ठरला.

सुपर फीदरवेट गटात झालेला हा मुकाबला ३२ मिनिटे चालला. पंचांनी अझहरल ७९-७२, ७६-७५, ७९-७२ असे विजयी घोषित केले. पहिल्या फेरीत २५ वर्षीय अझहरला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी पंचांचा निकाल त्याच्याविरुद्ध गेला होता; परंतु त्यानंतर त्याने चमकदार कामगिरी केली.

मुसंडी मारत पुढील सात फेऱ्यांमध्ये विजय मिळवत अझहरने विजेतेपद पटकाविले. तांत्रिकदृष्ट्याही तो निष्णात ठरला. त्याच्या नावावर आता पाच विजय झाले आहेत. तितक्याच वेळा त्याला पराभवही पत्करावा लागला. चार विजय त्याने नॉकआउटमध्ये मिळविले आहेत.

धर्मवीरच्या नावावर सात विजय आणि चार पराभवाची नोंद झाली. हा सामना गमावण्याच्या आधी तीन वर्षांपूर्वी त्यांना हार पत्करावी लागली होती. इंडियन बॉक्सिंग काऊन्सिलची मान्यता असलेल्या या स्पधेत पंजाबच्या जसकिरण िसंगने आपल्याच राज्याच्या हर्षमरदीपसिंगला पराभूत केले. मिडलव्हेट शिवाने सहा फेऱ्यांच्या लढतीत करणजीतसिंगवर विजय मिळविला.

logo
marathi.freepressjournal.in