कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाने केला मोठा विक्रम

ब्रॉडने एल्गरला बाद करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला
 कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाने केला मोठा विक्रम

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला ३६ धावांवर बाद करत कसोटी क्रिकेटमधील आपला ५६४ वा बळी टिपला. याचबरोबर त्याने कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राला मागे टाकले. आता तो त्याचा संघ सहकारी जेम्स अँडरसन याच्या मागे आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६६६ विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रॉडने एल्गरला बाद करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला. या यादीत आठशे विकेट्स घेणारा श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८) आहे. तिसऱ्या स्थानावर ६६६ विकेट घेणारा इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. चौथ्या क्रमांकावरील भारताच्या अनिल कुंबळेने ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. आता या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडदेखील सामील झाला आहे. तो आता पाचव्या स्थानावर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in