भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी 'हा' मोठा धक्का

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, स्टोइनिस पर्थमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करीत आहे.
भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी 'हा' मोठा धक्का

ऑस्ट्रेलियाचे स्टार अष्टपैलू मार्कस स्टोइनिस आणि डेव्हिड वॉर्नर हे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाहीत. वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे, तर स्टोइनिस दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. जर स्टोयनिस वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर तो भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, स्टोइनिस पर्थमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करीत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान तीन टी-२० सामन्यांसाठी भारतदौऱ्यावर जायचे आहे. या मालिकेपूर्वी स्टोइनिसला तंदुरुस्त होण्यासाठी एक आठवडा आहे. वॉर्नरला दुखापत झालेली नाही. त्याला केवळ विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ११३ धावांनी जिंकला असला, तरी या सामन्यात मार्कस स्टोइनिसला फक्त सहा चेंडू खेळता आले.

दुसऱ्या वन-डे सामन्यात फक्त तीन षट्के त्याने टाकली. न्यूझीलंडच्या डावाच्या २३ व्या षट्कात जिमी नीशमची विकेट घेतल्यानंतर स्टोइनिसने स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदान सोडले आणि त्यानंतर तो मैदानात परतु शकला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ भारतासाठी रवाना होईल. टी-२० मालिकेत फिंच संघाचा कर्णधार राहणार असल्याने त्याच्या नेतृत्वाखाली संघ २० सप्टेंबरपासून मोहालीत मोहीम सुरू करणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in