'ही' खेळाडू ठरली धोनीपेक्षा जास्त विजय मिळवून देणारी कर्णधार

आंतरराष्ट्रीय टी-२० संघाचा कर्णधार म्हणून धोनीने ७२ सामने खेळून ४१ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला
'ही' खेळाडू ठरली धोनीपेक्षा जास्त विजय मिळवून देणारी कर्णधार

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव करताच कर्णधार हरमनप्रीत कौरने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. हरमनप्रीत धोनीपेक्षा जास्त विजय मिळवून देणारी कर्णधार ठरली.

आंतरराष्ट्रीय टी-२० संघाचा कर्णधार म्हणून धोनीने ७२ सामने खेळून ४१ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. हरमनप्रीतने धोनीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत टी-२० संघाचा कर्णधार म्हणून ७१ सामने खेळत ४२ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. हरमनप्रीतने भारतीय कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४२वा विजय मिळवत महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये शार्लोत एडवर्ड्स (६८) आणि मॅग लॅनिंग (६४) यांच्या नंतर तिसरे स्थान पटकाविले. कर्णधार हरमनप्रीतसाठी हा सामना विशेष ठरला. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ स्थितीतील होता. भारतीय संघाने शानदार खेळ करून पाकिस्तानचा सहज पराभव केला. हरमनप्रीत म्हणाली की, “पहिला विजय नेहमीच महत्त्वाचा असतो. अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या असून आम्ही त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करू. संघ म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. आम्ही चांगली सुरुवात केली.”

दरम्यान, हरमनप्रीतच्या या कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. काहींनी तिची तुलनाही धोनीसोबत केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in