ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या या खेळाडूने  अजिंक्यपद पटकावले

ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या या खेळाडूने अजिंक्यपद पटकावले

तीन तास २० मिनिटे चाललेल्या या सामन्यात कार्लोसने चमकदार खेळ केला
Published on

अमेरिकन ओपन टेनिसच्या पुरुष गटालालाही महिला गटाप्रमाणेच नवा चॅम्पियन मिळाला. अंतिम सामन्यात स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्कारेझने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-४, २-६, ७-६ (१), ६-३ असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. या विजयासह अल्कारेझ एटीपी क्रमवारीतही नंबर वन‌वर पोहोचला. अल्कारेझचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

तीन तास २० मिनिटे चाललेल्या या सामन्यात कार्लोसने चमकदार खेळ केला. कार्लोसने उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचा पराभव करून टियाफोचा ६-७ (६), ६-३, ६-१, ६-७ (५), ६-२ असा पाच सेटच्या लढतीत पराभव प्रथमच अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. कॅस्पर रुडने उपांत्य फेरीत रशियाच्या कॅरेन खाचानोव्हचा ७-६ (५), ६-२, ५-७, ६-२ असा पराभव करून दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती.

एटीपी क्रमवारीत अव्वल झालेला सर्वात तरुण

कार्लोस एटीपी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचणारा तरुण खेळाडू बनला. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ल्युटन हेविटच्या नावावर होता. हेविट १९ नोव्हेंबर २००१ रोजी वयाच्या २० वर्षे ८ महिने २३ दिवसांत नंबर वन टेनिसपटू बनला होता.

logo
marathi.freepressjournal.in