विश्व बॅडमिंटन स्पर्धेत 'या' खेळाडूने अव्वल स्थान पटकाविले

पंचकुलाच्या १७ वर्षीय अनुपमाने अव्वल क्रमवारीत भारताच्याच तस्नीम मीरला बाजूला केले
विश्व बॅडमिंटन स्पर्धेत 'या' खेळाडूने अव्वल स्थान पटकाविले
Published on

युवा बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्यायने विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) ज्युनियर गट क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले. ती अंडर-१९ एकेरीच्या क्रमवारीत नंबर एकवर पोहोचणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. या वर्षी युगांडा आणि पोलंडमध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या पंचकुलाच्या १७ वर्षीय अनुपमाने अव्वल क्रमवारीत भारताच्याच तस्नीम मीरला बाजूला केले. अनुपमा १८ टूर्नामेंटमध्ये १८.०६० गुणांसह दोन क्रम पुढे सरकत अव्वल स्थानावर पोहोचली. ज्युनियर क्रमवारीतील टॉप टेनमध्ये चार भारतीय महिला खेळाडू आहेत. क्रमवारीत मुलांच्या एकेरी गटात आदित्य जोशी (२०१४), सिरिल वर्मा (२०१६), लक्ष्य सेन (२०१७) विश्व क्रमवारीत अव्वल राहिले आहेत. १८ वर्षीय शंकर मुथुसामी सुब्रमण्यनने गेल्या वर्षी नंबर एक क्रमांक पटकाविला होता.

logo
marathi.freepressjournal.in