रणजी करंडकच्या उपांत्य सामन्यात या खेळाडुचे शानदार शतक

मंगळवारी दहा धावांवर नाबाद राहिलेला शम्स मुलानी पाच चौकारांसह अर्धशतक झळकावून (१३० चेंडूंत ५०) मुंबईच्या डावातील ११७ व्या षटकात बाद झाला.
रणजी करंडकच्या उपांत्य सामन्यात या खेळाडुचे शानदार शतक

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी खेळ संपेपर्यंत उत्तरप्रदेशने पहिल्या डावात २ बाद २५ धावा केल्या. माधव कौशिक आणि कर्णधार कौशिक शर्मा हे अनुक्रमे ११ आणि १० धावांवर नाबाद आहेत. उत्तर प्रदेश अद्यापही ३६८ धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी, मुंबईचा पहिला डाव ३९३ धावांत संपुष्टात आला. मुंबईच्या डावात हार्दिक तामोरेने (२३३ चेंडूंत ११५) शानदार शतक झळकविले.

मंगळवारी दहा धावांवर नाबाद राहिलेला शम्स मुलानी पाच चौकारांसह अर्धशतक झळकावून (१३० चेंडूंत ५०) मुंबईच्या डावातील ११७ व्या षटकात बाद झाला. त्याला करण शमार्नो कौशिकच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. तनुष कोटियन ३७ चेंडूंत चार चौकारांसह २२ धावा काढून बाद झाला. सौरभ कुमारच्या गोलंदाजीवर शुभम मावीने त्याचा झेल टिपला. धवल कुलकर्णी १५ चेंडू खेळल्यानंतरही खाते उघडू शकला नाही. सौरभ कुमारच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू समीर रिझवीने त्याचा झेल टिपला. तुषार देशपांडे एक धावेवर बाद झाला. मंगळवारी नाबाद राहिलेल्या हार्दिकची एक षटकार आणि १२ चौकारांसह २३३ चेंडूंत सजलेली ११५ धावांची खेळी सौरभ कुमारने संपुष्टात आणली. १४१ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिकचा झेल जुरेलने टिपला आणि मुंबईचा पहिला डाव संपुष्टात आला.

त्याआधी मंगळवारी पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (२२७ चेंडूंत १००) साकारलेल्या शतकाच्या जोरावर ५ बाद २६० धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा हार्दिक ५१ व शम्स मुलानी १० धावांवर खेळत होते. उत्तर प्रदेशच्या दयाल व करण यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.

उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक नोंदवणाऱ्या यशस्वीने उत्तर प्रदेशविरुद्ध आघाडी फळी अपयशी ठरल्यानंतर मुंबईचा डाव सावरला होता. यशस्वीने उत्तरेच्या गोलंदाजांना निरुत्तर करीत २२७ चेंडूंत १५ चौकारांसह १०० धावा केल्या.

मुंबईच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली होती. कर्णधार पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला होता. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गने त्याचा सुरेख झेल टिपला. वेगवान गोलंदाज शिवम मावीने तिसऱ्या क्रमांकावरील अरमान जाफरला (१०) बाद करीत मुंबईला २ बाद २४ असे अडचणीत आणले होते. परंतु यशस्वीने उपांत्यपूर्व सामन्यातील द्विशतकवीर सुवेद पारकरच्या (३२) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. दयालने सुवेदला बाद करीत ही जोडी फोडली.

सर्फराज खानने आक्रमक खेळत ४० धावांचे योगदान देताना यशस्वीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. ऑफ-स्पिनर करण शर्माने त्याला बाद केले. आदित्य तरेच्या जागी संघात स्थान मिळविणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज हार्दिक तामोरेने अर्धशतक झळकाविले. यशस्वीने हार्दिकसह पाचव्या विकेसाठी ६३ धावा केल्या. यशस्वीel शतक साकारताच करणने त्याला बाद केले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in