Women’s Premier League : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये 'या' संघाची सर्वाधिक बोली

बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी याबाबत माहिती दिली. त्याशिवाय वुमन्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच संघ असतील हेही स्पष्ट
Women’s Premier League : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये 'या' संघाची सर्वाधिक बोली

पुरुषांच्या आयपीएलच्या धर्तीवर महिला इंडियन प्रीमियर लीगचे नाव बदलून 'वुमन्स प्रीमियर लीग' असे ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी याबाबत माहिती दिली. त्याशिवाय वुमन्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच संघ असतील हेही स्पष्ट झाले आहे. त्यात अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनौ या पाच संघांचा समावेश असेल, या संघाचा आज लिलाव झाला. अदानी ग्रुपने अहमदाबादचा संघ विकत घेतला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ विकत घेतला आहे. या संघासाठी त्याने मोठी रक्कम दिली आहे.

वुमन्स प्रीमियर लीगमधील पाच संघांचा आज लिलाव झाला. अहमदाबाद संघाने सर्वाधिक बोली लावली. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेडने अहमदाबादचा संघ १२८९ कोटी रुपयांना विकत घेतला. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईचा संघ ९१२.९९ कोटी रुपयांना विकत घेतला. वुमन्स आयपीएलमधील तिसरा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतला आहे. आरसीबीने बंगळुरूसाठी ९०१ कोटी रुपये दिले.. तर दिल्लीचा संघ जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने ८१० कोटी रुपयांना विकत घेतला. कापरी ग्लोबल होल्डिंग्सने लखनऊच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये खर्च केले आहेत. महिला प्रीमियर लीगमधील पाचही संघांची एकूण किंमत ४६६९.९९ कोटी रुपये झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला प्रीमियर लीग 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in