जागतिक टी-२० क्रमवारीत या महिला खेळाडूची गरुडभरारी

स्मृतीने इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात ९१ धावांची खेळी साकारली.
जागतिक टी-२० क्रमवारीत या महिला खेळाडूची गरुडभरारी

भारतीय महिला संघाची तारांकित डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने मंगळवारी आयसीसीच्या जागतिक ट्वेन्टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानी मुसंडी मारली. सांगलीच्या २६ वर्षीय स्मृतीने कारकीर्दीत प्रथमच दुसरा क्रमांक पटकावला. त्याशिवाय एकदिवसीय क्रमवारीत तिने सातव्या स्थानी मजल मारली आहे.

स्मृतीने इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात ९१ धावांची खेळी साकारली. त्यापूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत तिने एका अर्धशतकासह १११ धावा फटकावल्या होत्या. यापूर्वी ती चौथ्या स्थानावर होती. स्मृतीच्या खात्यात सध्या ७३१ गुण असून ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी ७४३ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने चार स्थानांनी आगेकूच करताना नववा क्रमांक मिळवला. त्याशिवाय यास्तिका भाटियाने आठ स्थानांची झेप घेत ३७वा क्रमांक पटकावला. गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्माने १२वे स्थान काबिज केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in