टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती त्रिनिदादचे पंतप्रधान डॉ. केथ रोवली यांनी सोमवारी दिली.
टी-२० विश्वचषक
टी-२० विश्वचषकटी-२० विश्वचषक

पोर्ट ऑफ स्पेन : अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती त्रिनिदादचे पंतप्रधान डॉ. केथ रोवली यांनी सोमवारी दिली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कडक सुरक्षाव्यवस्थेचे आश्वासन दिले आहे.

२ जूनपासून टी-२० विश्वचषकाला प्रारंभ होणार असून या स्पर्धेत भारतासह २० संघ सहभागी होतील. वेस्ट इंडिजमधील ६ ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी पोर्ट ऑफ स्पेन आणि गयाना येथे दहशतवादी हल्ला होण्याची धमकी एका मेलद्वारे मिळाली असल्याचे त्रिनिदादच्या पंतप्रधानांनी सांगितले. २९ जूनपर्यंत टी-२० विश्वचषक रंगणार असून यंदा प्रथमच अमेरिकेतही या स्पर्धेचे सामने होणार आहेत.

“२१व्या शतकातही दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम आहे. टी-२० विश्वचषकासाठीही काही ठिकाणी दहशतवादी संधी साधण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही यासंबंधी आयसीसीशी संवाद साधला असून प्रेक्षकांसह खेळाडूंना संपूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास सज्ज आहोत,” असे डॉ. केथ तेथील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. वेस्ट इंडिजमधील अँटिग्वा, गयाना, बार्बाडोस, सेंट लुशिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, ग्रेनाडा या ठिकाणी विश्वचषकाचे सामने होतील. अमेरिकेत फ्लेरिडा, न्यूयॉर्क व टेक्सास येथे लढती होतील. भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्क येथे खेळवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in