लिजंड्स लीग क्रिकेट सीझन 2 चा उद्यापासून थरार

या स्पर्धेदरम्यान १६ सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व डिस्नी हॉटस्टार वरून थेट व एक्सक्लुजिव पद्धतीने प्रसारित होणार आहे
लिजंड्स लीग क्रिकेट सीझन 2 चा उद्यापासून थरार

जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू १६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत लिजंड्स लीग क्रिकेट सीझन-२च्या निमित्ताने मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेचा अधिकृत प्रसारणकर्ता डिस्नी स्टार असेल, असे आयोजकांनी जाहीर केले आहे. या स्पर्धेदरम्यान १६ सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व डिस्नी हॉटस्टार वरून थेट व एक्सक्लुजिव पद्धतीने प्रसारित होणार आहे. हे सामने कोलकाता, दिल्ली, लखनऊ, कटक, जोधपूर या देशाच्या वेगवेगळ्या भागात होणार आहेत.

लिजंड्स लीग क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सह-संस्थापक रमन रहेजा यांनी सांगितले की, “लिजंड्स लीगची गोडी सर्वोत्तम क्रीडा समालोचक व विश्लेषक वाढविणार आहेत. देशभरातील असंख्य क्रिकेट चाहत्यांपुढे दर्जेदार विश्लेषण करणार आहेत.” लिजंड्स लीग क्रिकेटच्या प्रसारणाचे हक्क मिळाल्याबद्दल डिस्नी स्टारचे प्रवक्ता म्हणाले, “डिस्नी स्टार हे क्रिकेटच्या काही सर्वोत्तम खजिन्यांचे घर आहे. यामुळे चाहत्यांना काही अविस्मरणीय आणि उत्सवी क्षणांचा अनुभव देता येतो. लिजंड्स क्रिकेट लीगचा अनुभव आणखी उच्च पातळीवर नेण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

अदानी स्पोर्ट्सलाइन, जीएमआर स्पोर्ट्स, मणिपाल एज्युकेशन व हेल्थ केअर (एमईएचयू) आणि भिलवाडा ग्रुप्स या चार आघाडीच्या भारतीय उद्योगांनी अनुक्रमे गुजरात जाएंट्स, इंडिया कॅपिटल्स, मणिपाल टायगर्स व भिलवाडा किंग्ज या चार संघांच्या फ्रँजायझी घेतल्या आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रातील दिग्गज या निमित्ताने मैदानावर उतरणार आहेत. प्रेक्षक व चाहत्यांना गौतम गंभीर विरुद्ध वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल विरुद्ध हरभजन सिंग, मिशेल जॉन्सल विरुद्ध ब्रेट ली, शेन वॉट्सन विरुद्ध मुथय्या मुरलीधरन यांच्यातील जुगलबंदी अनुभवता येणार आहे. लिजंड्स लीग क्रिकेट सीझन-२ मधील संपूर्ण अॅक्शन थेट व एक्सक्लुजिव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व डिस्नी हॉटस्टारवर १६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संध्याकाळी ७.३० पासून अनुभवता येणार आहे.

खास बेनिफिट मॅचचे आयोजन

या लीगमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे औचित्य साधून एक खास बेनिफिट मॅच इंडियन महाराजाज विरुद्ध वर्ल्ड जाएंट्स यांच्यात १६ सप्टेंबर रोजी ईडन गार्डनवर खेळविली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in