टियाफोने रोखला नदालचा विजयरथ; टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत धडक

टियाफो हा अवघा २४ वर्षांचा असून त्याला अमेरिकी ओपनमध्ये २२वे मानांकन मिळाले आहे.
टियाफोने रोखला नदालचा विजयरथ; टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत धडक

फ्रांसेस टियाफोने राफेल नदालचा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील गेल्या २२ सामन्यांपासून चाललेला विजयरथ रोखून प्रथम अमेरिकी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत धडक मारली.

चौथ्या फेरीतील सामन्यात टियाफोने नदालला ६-४, ४-६, ६-४, ६-३ने नमविले. टियाफो हा अवघा २४ वर्षांचा असून त्याला अमेरिकी ओपनमध्ये २२वे मानांकन मिळाले आहे. टियाफोने विजयानंतर सांगितले की, “मला जग जागच्या जागी थांबल्यासारखेच वाटले. एक मिनिटभर मला काहीच ऐकू आले नाही.’’

एंडी रोडिक (२००६) याच्यानंतर या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत धडक मारणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. टियाफोचा सामना आता आंद्रे रुबलेव याच्याशी होईल. आंद्रे रुबलेवने सातवा मानांकित कॅमरन नोरीला ६-४, ६-४, ६-४ असे नमविले होते. नदालने यावर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया ओपन आणि जूनमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर जुलैमध्ये विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता; परंतु पोटाचे स्नायू दुखावल्याने त्याने माघार घेतली होती. अमेरिकी ओपनमध्ये चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या नदालला यानंतर केवळ एकाच स्पर्धेत खेळता आले होते.

दरम्यान, महिला गटात अव्वल मानांकित इगा स्वियातेकने पहिला सेट गमावल्यांनतर शानदार मुसंडी मारत जूल नेमीयरला २-६, ६-४, ६-० असे नमविले. ती प्रथमच उपउपांत्य फेरीत पाहोचली. स्वियातेक का मुकाबला आता आठवी मानांकित जेसिका पेगुला हिच्याशी होईल. जेसिकाने दोन वेळा विम्बल्डन विजेता ठरलेल्या पेत्रा क्वीतोवाला ६-३, ६-२ असे पराभूत केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in