Duleep Trophy Cricket Tournament: तिलक, प्रथमच्या शतकामुळे भारत अ संघ सुस्थितीत

प्रथम सिंग आणि तिलक वर्मा यांनी झळकावलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघ दुलीप करंडक क्रिकेट स्थितीत भक्कम स्थितीत आहे.
Duleep Trophy Cricket Tournament: तिलक, प्रथमच्या शतकामुळे भारत अ संघ सुस्थितीत
PTI
Published on

अनंतपूर : प्रथम सिंग आणि तिलक वर्मा यांनी झळकावलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघ दुलीप करंडक क्रिकेट स्थितीत भक्कम स्थितीत आहे. त्यांनी दुसरा डाव ३ बाद ३८० धावांवर घोषित करत भारत ड संघासमोर विजयासाठी ४८८ धावांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे ध्येय पार करताना भारत ड संघाची स्थिती तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६२ अशी झाली आहे.

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या तिलक वर्माने १९३ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद १११ धावांची खेळी केली. शतक साजरे केल्यानंतर त्याने कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अगदी शांत आणि संयमाने सेलिब्रेशन केले. प्रथमने १२ चौकार आणि १ षटकारासाह १२२ धावांची खेळी केली.

कालच्या ५९ धावासंख्येवरून खेळताना प्रथमने १४९ चेंडूंत आपले शतक साजरे केले. रेल्वेचा सलामीवीर, ३२ वर्षीय प्रथम मात्र डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारची शिकार ठरला. प्रथमने सलामीसाठी मयांक अगरवालसह ११५ धावांची तर दुसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मासह १०४ धावांची भागीदारी रचली होती. भारत अ संघासाठी मयांक अगरवालने दुसऱ्या डावात ५६ तर शशांक रावतने नाबाद ६४ धावांचे योगदान दिले.

भारत अ संघाच्या ४८८ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ड संघाला तिसऱ्याच षटकांत पहिला धक्का बसला. सलामीवीर अथर्व तायडे याला वेगवान गोलंदाज खलील अहमदने आकिब खानकरवी झेलबाद केले. त्यानंतर यश दुबे (खेळत आहे १५) आणि रिकी भुई (खेळत आहे ४४) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. आता चौथ्या आणि शेवटच्या दिवशी भारत ड संघाला विजयासाठी अद्याप ४२६ धावांची आवश्यकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in