तेजस्विन शंकरला जेतेपद

पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता शंकरचा सराव सुरू असून त्याला २.३३ मीटर हा पात्रता निकष अद्याप तरी पार करता आलेला नाही.
तेजस्विन शंकरला जेतेपद
Published on

नवी दिल्ली : भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर उंचउडीपटू तेजस्विन शंकर याने बेल्जियम येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल उंच उडी गाला एल्मोस २०२४ स्पर्धेत २.२३ मीटर इतकी कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर शंकर पहिल्यांदाच स्पर्धेत उतरला आहे. शनिवारी झालेल्या या स्पर्धेत शंकरने ग्रीसच्या अँटोनिओस मेर्लोस याला (२.२० मीटर) मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. २५ वर्षीय शंकरने पुरुष उंचउडी आणि डिकॅथलॉन प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदवला असला तरी शनिवारी त्याला आपल्या २.२० मीटरच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सरस कामगिरी करता आली नाही.

शंकर सध्या डिकॅथलॉन प्रकारावर लक्ष केंद्रित करत असून गेल्या वर्षीच्या आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने डिकॅथलॉनमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता शंकरचा सराव सुरू असून त्याला २.३३ मीटर हा पात्रता निकष अद्याप तरी पार करता आलेला नाही. तो आता २० फेब्रुवारी रोजी चेक प्रजासत्ताक येथे होणाऱ्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in